-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार बरेच चर्चेत आले.
-
या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
-
इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात.
-
वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
-
पण अजूनही तिचं राहणीमान अगदी साधं आहे.
-
वनिताने काही महिन्यापूर्वी ‘संपूर्ण स्वराज’ या पॉडकास्टला एक मुलाखत दिली.
-
त्या मुलाखतीमध्ये तिने तिचं राहणीमान आणि कुटुंबाविषयी सांगितले होतं.
-
“सेलिब्रिटी म्हटलं की, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.”
-
“पण मला अगदी साधंच राहायचं आहे.”
-
“मी मध्यमवर्गीय आहे. सामान्य कुटुंबामधूनच मी इथपर्यंत पोहोचली.”
-
“आपण टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांना पाहून भारावून जाणारी लोकं आहोत.”
-
“टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांचं कमाल लाइफस्टाइल असेल असं आपल्याला वाटतं.”
-
“पण प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतंच असं मला वाटत नाही.”
-
“पैसे, राहणीमान किंवा इतर बाबतीत हळूहळू एखादा व्यक्ती प्रगती करतो.”
-
“टीव्हीवर दिसणाऱ्या माणसांकडे खूप पैसे असतात असं लोकांना वाटतं. पण असंच असतं असं काही नाही.”
-
“मी अजूनही चाळीत राहत होते. लग्नानंतर मी दुसऱ्या ठिकाणी राहायला आली आहे.”
-
“माझे आई-बाबा अजूनही चाळीत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात.”
-
“जेव्हा मी बाईकवरुन फिरते तेव्हा लोकांना असं वाटतं की, काय ही बाईकने प्रवास करते.”
-
“तुम्ही सेलिब्रिटी आहात तर गाडीने फिरलं पाहिजे.”
-
“पण मला जसं आहे तसंच राहायला आवडतं.”
-
“आपण साधी माणसं आहोत आणि मला तसंच राहायचं आहे”, असे वनिताने म्हटले होते.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल