-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
-
३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजताना दिसत आहे.
-
या चित्रपटाने आतापर्यंत ५४ कोटींची कमाई केली आहे.
-
नुकतेच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते.
-
वलय मुळगुंद यांनी सक्सेस पार्टीचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी ‘बाईपण भारी देवा’ टीमने वरळी येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते.
-
यावेळी संपूर्ण टीमने केक कापून यशाचा आनंद साजरा केला.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील बरीच मंडळी या पार्टीत हजर होती.
-
या सक्सेस पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अजूनही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची घौडदौड सुरुच आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : बाईपण भारी देवा / इन्स्टाग्राम)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…