-
मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ नेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
-
मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मध्ये गुहागरमध्ये झाला होता.
-
आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं.
-
१०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे.
-
जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही भूमिका केल्या होत्या.
-
९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भुषवलं होतं.
-
जयंत सावरकर यांनी ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे.
-
जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते.
-
जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (२५ जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा