-
केतकी माटेगावकर हिने ‘शाळा’ चित्रपटात काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली.
-
तिच्या गण्याबरोबरच तिच्या अभिनयाचेही सर्वजण चाहते झाले.
-
तर आता तिने तिच्या कामाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
-
केतकी लवकरच पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘अंकुश’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत ती पैसा आणि प्रसिद्धीसाठी कधीही काम करत नाही असं म्हणाली आहे.
-
ती म्हणाली, “ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या कामांमध्ये शंभर टक्के खात्री वाटते असेच प्रोजेक्ट करण्यात अर्थ आहे.”
-
“नुसता पैशांचा विचार करून किंवा दिसत राहायचं म्हणून काम कराव असं मला कधीही वाटत नाही.”
-
“कारण मला ती माझी जबाबदारी वाटते.”
-
“आतापर्यंत मला रसिक मायबाप प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं आहे, मला त्याला जागायचं आहे.”
-
“मला कुठेही त्यांना निराश करायचं नाही.”
-
“त्यामुळे मी खूप विचारपूर्वक काम घेते आणि त्यात माझा शंभर टक्के देते.”

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या