-
‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत तिने साकारलेली सोज्वळ, साधी सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
-
जुईच्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीत देखील अव्वल स्थानावर आहे.
-
मालिकाविश्वातील आघाडीच्या या अभिनेत्रीला बऱ्याच टोपण नावांनी हाक मारली जाते. याचा खुलासा तिनं स्वतः केला आहे.
-
‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी बोलताना अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या टोपण नावांचा खुलासा केला.
-
जुईला तिच्या घरामध्ये आणि मित्र-मैत्रीणी जुया या नावाने हाक मारतात.
-
तसेच जुईची आई तिला मिनू म्हणते.
-
तिच्या गायनाच्या शिक्षिका सुप्रिया महाजन या तिला झुमा, जुडा अशी हाक मारतात.
-
जुईच्या भावाने तिला मजेशीर टोपण नाव दिलं आहे. ते म्हणजे घंटागाडी. यामागचं तिनं कारण देखील सांगितलं आहे.
-
जुई म्हणाली की, “मी सतत साफसफाई करत असते म्हणून त्यानं माझं नाव मोबाइलमध्येही घंटागाडी असं सेव्ह केलं आहे.”
-
दरम्यान, जुईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेनंतर ती ‘वर्तुळ’ या मालिकेत पाहायला मिळाली होती.
-
तसेच जुई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली होती. यानंतर काही काळ्याच्या विश्रांतीने जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जबरदस्त पुनरागमन केलं.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”