-
प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ती सहभागी झाली होती, या कार्यक्रमामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
-
मेघा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती विविध प्रकारचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
सध्या मेघा नवरात्रीच्या नऊ रंगाच्या कपड्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग ‘केशरी’ होता. यालाच अनुसरून मेघाने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
यावेळी तिने कपाळावर भंडारा लावला होता. मेघाचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता.
-
यानंतर तिने नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने पांढऱ्या बंगाली साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने केसांची वेणी बांधली असून ऑक्साइड दगिन्यांनी साजशृंगार केला आहे. मेघाने घातलेल्या निळ्या ब्लाऊजवर सुंदर नक्षीकाम आहे.
-
मेघाने सुंदर पोजमध्ये हे फोटोशूट केलं असून तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Photos: Megha/Instagram)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली