-
मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नाव घेतलं जातं.
-
आजवर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनीने अलीकडेच एका युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
-
या मुलाखतीत तेजस्विनी पंडितने तिच्या ऑडिशनची आठवण आणि पहिल्या क्रशबद्दल सांगितलं.
-
एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीसाठी तेजस्विनीची ३० ते ३७ मुलींमधून पहिल्याच झटक्यात निवड करण्यात झाली होती. त्यापूर्वी तिने इंडस्ट्रीत कधीही काम केलं नव्हतं.
-
पहिल्याच प्रोजेक्टमध्ये अभिनेत्रीला अंकुश चौधरीबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
-
तेजस्विनी याबद्दल सांगते, “माझ्या बऱ्याच मुलाखतींमध्ये मी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की, तेव्हा माझा अंकुश चौधरींवर मेजर क्रश होता.”
-
“तेव्हा अंकुश सरांबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी माझ्याकडे एक टोपी होती त्यावर मी त्यांची सही घेतली होती. ती टोपी मी प्रचंड मिरवली.” असं तेजस्विनीने सांगितलं.
-
दरम्यान, तेजस्विनी पंडित आणि अंकुश चौधरीने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवा’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल