-
Star Pravah Dhinchyak Diwali 2023: लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे.
-
आपल्या प्रत्येकाच्याच घरी दिवाळीची जय्यत तयारी सुरु झाली असेल.
-
सणांची मजा तेव्हा द्विगुणीत होते जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो.
-
यंदा स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आहे.
-
फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स यंदाची दिवाळी आणखी स्पेशल करणार आहेत.
-
स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.
-
ढिंचॅक दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या आवडत्या पात्रांचा आजवर न पाहिलेला अंदाज पाहायला मिळेल.
-
तुमच्या आवडत्या जोड्यांच्या रोमॅण्टिक अंदाजाबरोबरच, खलानायिकांच्या दिलखेचक अदा यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक करतील.
-
धमाकेदार परफॉर्मन्सेससह सिद्धार्थ जाधव, हर्षदा खानविलकर, विशाखा सुभेदार आणि रेश्मा शिंदे यांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली आहे.
-
मोगराभाईच्या रुपात मंचावर अवतरलेल्या सिद्धार्थ जाधवने मंचावर अक्षरश: धिंगाणा घातला आहे.
-
तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह परिवाराची ढिंचॅक दिवाळी ५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह / इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक