-
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट लवकरच नवाजुद्दिन सिद्दिकीसह एका हिंदी थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. (Photo: Priya/Instagram)
-
या चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात असून १९९०मधील कथेवर हा चित्रपट आधारित असेल असे सांगण्यात आले आहे. (Photo: Priya/Instagram)
-
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया यांच्या पटकथेवरून सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. (Photo: Priya/Instagram)
-
निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट “सस्पेन्स, ड्रामा आणि नॉस्टॅल्जिया” ची रोलर-कोस्टर राइड असेल. (Photo: Priya/Instagram)
-
‘काकस्पर्श’, ‘हॅपी जर्नी’ आणि ‘आम्ही दोघी’ सारखे मराठी चित्रपट तसेच ओटीटी मालिका ‘सिटी ऑफ ड्रीम्स’साठी ओळखल्या जाणार्या प्रियाने सांगितले की नवाजुद्दिन सिद्दिकीसह काम करताना तिला खूप आनंद झाला. (Photo: Priya/Instagram)
-
“ज्या दिवशी मी या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हापासूनच मी या चित्रपटाचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. नवाजुद्दिनसह काम करणे हा एक वेगळाच आनंद होता.” प्रिया पुढे म्हणाली. (Photo: Priya/Instagram)
-
“चित्रपटाची कथा आकर्षक असून तिने 90 च्या दशकातील नॉस्टॅल्जियाचा एक अतिरिक्त स्तर जोडला आहे. नवाजुद्दीनबरोबर काम करणे हा रोजचा शिकण्याचा अनुभव आहे आणि आम्ही या वेधक कथेला जिवंत करण्यास उत्सुक आहोत,” असे प्रियाने म्हटले आहे. (Photo: Priya/Instagram)
-
प्रिया आणि नवाजुद्दिनची जोडी चित्रपटात ताजेपणा आणेल, असे सेजल शाह म्हणाली. (Photo: Priya/Instagram)
-
“मला खूप आनंद झाला आहे की प्रिया बापट आमच्यासह काम करण्यास तयार झाली. प्रिया ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि ती व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करते. नवाज आणि प्रियाची पडद्यावरची केमिस्ट्री ताजी आणि अनोखी आहे,” असेही ती म्हणली. (Photo: bsl_films/Instagram)
-
या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू असून, 40 दिवसांच्या शूटिंगचे शेड्युल आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शाह आणि भावेश मंडलिया यांनी केली आहे. (Photo: bsl_films/Instagram)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा