-
अभिनेता श्रेयस तळपदेला वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री सुष्मिता सेनलाही हृदयविकाराचा झटका आला होता.
-
आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया, ज्यांना कमी वयातच हृदयविकाराचा झटका आला आहे. मात्र, त्यातील काहीजणांना पुनर्जीवन मिळाले तर काहींनी लहान वयातच जगाचा निरोप घेतला.
-
अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी मुंबईत शूट संपल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय श्रेयस ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग करत होता आणि संध्याकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. आता त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
-
श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो आता बरा आहे.
-
सुष्मिता सेनलाही फेब्रुवारी २०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तिची वयाच्या ४७ व्या वर्षी अँजिओप्लास्टी झाली. सुष्मिता सेनने स्वतः तिच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की तिच्या हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य धमनीत ९५% ब्लॉकेज होते.
-
सैफ अली खानला 2007 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याची ईसीजी करण्यात आली. यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे उघड झाले. यादरम्यान सैफ 36 वर्षांचा होता.
-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 2 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले.
-
2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने अभिनेता सुनील ग्रोव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची बायपास सर्जरी झाली आणि 3 फेब्रुवारी 2022 रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. हृदयविकाराचा झटका आला त्यावेळेस सुनील 45 वर्षांचा होता.
-
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीत राजकुमारला सकाळी छातीत दुखू लागलं, त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत बेंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
-
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. 2020 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
-
मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक-निर्माते राज कौशल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 30 जून 2021 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
-
कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो 39 वर्षांचा होता. त्याला श्वासोच्छवासाचा त्रास आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती. यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. 7 जून 2020 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल