-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुव दातार काल (१५ डिसेंबर) रोजी लग्नबंधनात अडकला.
-
ध्रुवने कोरिओग्राफर अक्षता तिखेबरोबर मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
-
‘KaiwalyaPhotos’ या इन्स्टाग्राम पेजने ध्रुव आणि अक्षताच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी अक्षताने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
ध्रुवने जांभळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सेट परिधान केला आहे.
-
पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ध्रुव आणि अक्षता अतिशय सुंदर दिसत आहेत.
-
१४ मे रोजी ध्रुव आणि अक्षताचा साखरपुडा पार पडला होता.
-
लग्नातील फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
ध्रुव आणि अक्षताच्या व्हिडीओवर अभिनेत्री सुखदा खांडकेकरने ‘Aww Ga !!!! Missed Being There N How!!!!’ अशी कमेंट केली आहे.
-
याआधी ध्रुवने झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ध्रुव दातार आणि KaiwalyaPhotos/इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक