-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.
-
प्रत्येक सप्ताहात ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते.
-
या मालिकेत ‘अधिपती’ची भूमिका अभिनेता हृषिकेश शेलार साकारत आहे.
-
हृषिकेशने २०२३ या वर्षांला निरोप देताना काही आठवणी सांगितल्या आहेत.
-
हृषिकेश म्हणाला, २०२३ ने मला दिलेली सर्वात बेस्ट भेट ही माझी मुलगी आहे.
-
गुरुवार, १२ जानेवारी रोजी माझ्या घरी लक्ष्मी आली.
-
त्यानंतर पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली.
-
२०२३ ने मला हे शिकवले की जर आपली स्वप्न पूर्ण कारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरते.
-
२०२३ तुझे मी आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आठवणी दिल्या आहेस.
-
येणार वर्षसुद्धा असंच असुदे अशी आशा मी करतो आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की