-
‘तुला पाहते रे’, ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवार २८ डिसेंबर लग्नबंधनात अडकली. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
समीर पालुष्टेबरोबर सातफेरे घेऊन सोनलने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सोनल-समीरची मुंबई-पुणे फिल्मी लव्हस्टोरी आहे. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
एका चित्रपटाच्यादरम्यान सोनल-समीर यांची भेट झाली. इथेच दोघांची ओळख झाली. पण लॉकडाऊनमुळे हा चित्रपट थांबला. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर लॉकडाऊनदरम्यान सोनल-समीरची मैत्रीचं नातं आणखी चांगलं झालं. दोघं एकमेकांना सतत भेटू लागले. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सोनल समीरला भेटण्यासाठी पुण्याला जायची. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
पण काही काळानंतर पुन्हा त्या चित्रपटाचं काम सुरू झालं. त्यानंतर सोनल-समीरच्या भेटीगाठी वाढत गेल्या. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
दोघांमधली मैत्री आणखी चांगली झाली आणि दोघं एकमेकांच्या घरी सतत जाऊ लागले. पण सोनल-समीरने कधीच एकमेकांना प्रपोज केलं नाही. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
एकेदिवशी सोनलच्या सासरच्यांनी दोघांना डेट करतायत का? असं विचारलं. तेव्हा सोनल-समीरने नकार दिला. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर दोघांच्या घरचे लग्नासाठी स्थळ बघू लागले. सोनल-समीर एकमेकांना आलेली स्थळ दाखवायचे आणि तुला हा सूट होत नाही, मज्जा नाही असे सल्ले द्यायचे. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
मग समीरच्या घरच्यांनी पुढाकार घेतला. सोनल-समीरला लग्नासाठी एकमेकांबद्दल विचार करा, असं सांगितलं. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
दोघांनी खूप विचार केला. सहा ते सात महिन्यानंतर सोनल-समीरने संसार थाटायचा असं ठरवलं. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
नोव्हेंबर २०२३ मध्ये सोनलने समीरबरोबर गुपचूप साखरपुडा केला. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर डिसेंबर २०२३मध्ये मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असं साग्रसंगीत लग्न केलं. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
पण लग्नानंतर सोनलने ‘रमा राघव’ या मालिकेतून एक्झिट घेतली. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम