-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली.
-
कलाविश्वातील करिअरप्रमाणेच गेल्या काही वर्षांत प्राजक्ताने वैयक्तिक आयुष्यात देखील उंच भरारी घेतली आहे.
-
स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर जुलै २०२३ मध्ये प्राजक्ताने कर्जत येथे आलिशान फार्महाऊस खरेदी केलं.
-
हे आलिशान फार्महाऊस अभिनेत्रीने कर्ज काढून घेतलेलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत प्राजक्ताने याविषयी खुलासा केला.
-
प्राजक्ता माळीने फार्महाऊसच्या फोटोंना खानदानातील सर्वात मोठं कर्ज असं कॅप्शन दिलं होतं.
-
याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “फार्महाऊस खरेदी करणं हे सर्वात मोठं धाडस आहे कारण, माझं एवढं बजेट नव्हतं. पण, त्या घराच्या मी पाहताक्षणी प्रेमात पडले आणि माझ्याकडची सगळी पुंजी पणाला लावली.
-
“ही प्रॉपर्टी माझ्याकडे आयुष्यभर राहणार हे मला माहीत होतं. त्यात मला निसर्गाची प्रचंड आवड आहे. दहा-दहा दिवस असं बाहेर जाऊन एकांतात राहायला मला खूप आवडतं. म्हणून हे फार्महाऊस खरेदी करण्याचा मी निर्णय घेतला.” असं प्राजक्ताने सांगितलं.
-
हे फार्महाऊस खरेदी करताना अभिनेत्रीला तिच्या कुटुंबीयांची खूप मोठी साथ लाभली.
-
प्राजक्ताच्या घरातील सगळ्या मंडळींनी या घरासाठी आपलं सोनं गहाणं ठेवलं होतं.
-
अभिनेत्री याबद्दल सांगते, “माझ्या आईने एफडी मोडल्या, कर्ज काढलं, दागिने गहाण अन् भावाने चैन गहाण ठेवली. सगळ्या कुटुंबीयांना मला फार्महाऊस घेताना खूप मोठी मदत केली.”
-
फार्महाऊस खरेदी करताना प्राजक्ताच्या भावाच्या व वडिलांच्या मनात सुरुवातीला प्रचंड भीती होती.
-
“पण, आईने या सगळ्यात तुला योग्य वाटेल तो निर्णय घे असं ठामपणे सांगितलं होतं. आईला नेहमीच माझ्यावर खूप विश्वास असतो.” असं प्राजक्ता माळीने सांगितलं.
-
भविष्यात कर्जतसारखं आलिशान घर मुंबईत असावं अशी इच्छा प्राजक्ताने यावेळी व्यक्त केली.
-
अभिनेत्रीच्या कर्जतच्या फार्महाऊसला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील बऱ्याच कलाकारांनी भेट दिली आहे.
-
दरम्यान, प्राजक्ता माळीने तिच्या या आलिशान फार्महाऊसचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल