-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही हास्यमालिका संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी आहे.
-
या हास्यमालिकेतून विनोदवीर अभिनेता दत्तू मोरे घराघरात लोकप्रिय झाला.
-
दत्तू मोरेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.
-
दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वाती घुनागेबरोबर कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली.
-
दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केले नव्हते.
-
स्वाती ही डॉक्टर (स्त्रीरोग तज्ञ) आहे.
-
स्वातीच्या वाढदिवसानिमित्त दत्तूने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना दत्तूने ‘Happy Birthday My Love… अशीच हसत रहा,आणि खुश रहा… बाकी मी आहेच’ असे कॅप्शन दिले आहे.
-
स्वातीच्या शॉर्ट्समधील लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
स्वातीला नेटकऱ्यांनी वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे/इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?