-
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिर्गर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.
-
अनेकदा करण त्याच्या जुळ्या मुलांचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
नुकतंच करणने त्याच्या जुळ्या मुलांच्या म्हणजेच रूही व यश यांच्या सातव्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी आयोजित केली होती.
-
या पार्टीतील काही फोटोज नुकतेच करणने शेअर केले आहेत.
-
करणने यश व रूही यांच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त एक मस्त पार्टी आयोजित केली होती.
-
एक वेगळीच थीम ठरवून करणने त्याच्या मुलांचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला. या फोटोमध्ये करण त्याच्या मुलांबरोबर धमाल करताना पाहायला मिळत आहे. या पार्टीत करणची आई हिरू जोहरदेखील होत्या, त्यांच्याबरोबरचा एक फॅमिली फोटोदेखील करणने शेअर केला आहे.
-
या पार्टीला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.
-
करीना कपूर व इतरही काही सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर रूही व यश यांचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.
-
सोशल मीडियावर या पार्टीतील फोटोज शेअर करत करण जोहरने भला मोठा मेसेज लिहीत आपल्या दोन्ही मुलांना सदिच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : करण जोहर / इंस्टाग्राम पेज)
जमीन खरेदीचा व्यवहार रद्द; पार्थ पवारप्रकरणी अजित पवारांची माघार