-
‘कुंकू झालं वैरी’, ‘आयला रे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पल्लवी सुभाष फारशी आता इंडस्ट्रीत दिसत नाही. (फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम)
-
२०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेकंड शो’ या दाक्षिणात्य चित्रपटात ती शेवटची दिसली होती. (फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम)
-
सध्या पल्लवी जाहिरात क्षेत्रात रमली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या क्षेत्रात काम करत आहे. (फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम)
-
पल्लवी जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असायची तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. (फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम)
-
एकेकाळी पल्लवीचं मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबरच अफेअर चांगलंच गाजलं होतं. (फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम)
-
पल्लवी व अनिकेत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जोडीने उपस्थित राहायचे.
-
पल्लवी व अनिकेतने एक वेगळं फोटोशूटही केलं होते, जे खूप चर्चेत राहिलं होतं.
-
दोघं ८ वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण अचानक हे नातं मोडलं.
-
ब्रेकअपच्या कारणाचा दोघांनी कधीही खुलासा केला नाही. सध्या दोघं आपल्याला कामात व्यग्र आहेत. (फोटो सौजन्य – अनिकेत विश्वासराव इन्स्टाग्राम)
-
पल्लवीबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर अनिकेतने अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न केलं होतं. (फोटो सौजन्य – अनिकेत विश्वासराव इन्स्टाग्राम)
-
कालांतराने अनिकेत व स्नेहाच्या लग्नातही अनेक समस्या आल्या. स्नेहाने अनिकेतवर गंभीर आरोप केलं. त्यानंतर दोघं घटस्फोट घेऊन विभक्त झाले. (फोटो सौजन्य – अनिकेत विश्वासराव इन्स्टाग्राम)
-
अनिकेतचं ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. ३ फेब्रुवारीला या नाटकाचा ३५०वा प्रयोग झाला होता. (फोटो सौजन्य – अनिकेत विश्वासराव इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case