-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुन्हा एकदा अभिनेत्री रेश्मा शिंदे नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य – रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम)
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत रेश्मा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’चे नवनवीन प्रोमो समोर येत आहेत. ज्यामधून रेश्मासह झळकणाऱ्याला कलाकारांचा खुलासा होतं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
आतापर्यंत या नव्या मालिकेत रेश्माबरोबर आरोही संभारे, सविता प्रभुणे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, उदय नेने, सुनील गोडबोले, प्रमोद पवार, नैना आपटे पाहायला मिळणार असल्याचं जाहीर झालं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
पण ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मासह प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार आहे? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
मात्र सुत्रांच्या माहितीनुसार, ‘स्टार प्रवाह’च्या या नव्या मालिकेत ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – सुमित पुसावळे इन्स्टाग्राम)
-
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत सुमित बाळुमामाच्या रुपात पाहायला मिळाला. पण आता लवकरच वेगळ्या रुपात तो झळकणार आहे. (फोटो सौजन्य – सुमित पुसावळे इन्स्टाग्राम)
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
तसेच ७.३० वाजता सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ दुपारी २.३० वाजता प्रसारित होणार आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

Sonam Raghuvanshi: सोनमनंच केली पतीची हत्या; धक्कादायक खुलासा! राजाच्या हत्येनंतर गाझिपूरमध्ये विमनस्क अवस्थेत सापडली पत्नी