-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. ( फोटो सौजन्य : प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम )
-
सध्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे हे विनोदवीर ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. ( फोटो सौजन्य : प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम )
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली असून तेथील महत्त्वाच्या शहरांमध्ये हे कलाकार लाइव्ह परफॉर्म करणार आहेत. (फोटो सौजन्य : प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम)
-
विनोदवीरांसह या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
-
यावेळी या सगळ्या कलाकारांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला भेट दिली. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी व चेतना भट इन्स्टाग्राम )
-
याशिवाय हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने मिळून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी एका ट्रेडिंग गाण्यावर जबदस्त डान्स केला. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
-
“कुडिये नी…” या लोकप्रिय गाण्यावर हे विनोदवीर थिरकले. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
-
प्राजक्ता माळीसह पृथ्वीक प्रताप, सचिन मोटे, समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, चेतना भट या सगळ्या कलाकारांनी मिळून हा डान्स केला. ( फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
-
सध्या हास्यजत्रेच्या कलाकारांचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. ( फोटो सौजन्य : समीर चौघुले इन्स्टाग्राम स्टोरी )

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL