-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह मुंबईतील त्यांच्या सागर बंगल्यावर धुळवड साजरी केली.
-
धुळवडीचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
संपूर्ण फडणवीस कुटुंब यावेळी एकत्र पाहायला मिळालं.
-
देवेंद्र व अमृता फडणवीस यांची लेक दिविजा देखील धुलिवंदनाचा आनंद घेत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
फडणवीस कुटुंबीयांनी सागर बंगल्यावर सणानिमित्त एकत्र सेलिब्रेशन केलं.
-
उपमुख्यमंत्र्यांनी या फोटोंना कौटुंबिक होळी असं कॅप्शन दिलं आहे.
-
तसेच महाराष्ट्राच्या जनतेला खास होळी व धुळवडीच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत.
-
फडणवीस कुटुंबाच्या धुळवड सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
अवघ्या काही तासांतच उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल