-
दरवर्षी प्रमाणेच यंदाही मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अतिशय धुमधडाक्यात होळीचा सण साजरा केला.
-
बिगबॉस १७मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या मित्रपरिवारासाठी होळी पार्टीचे आयोजन केले होते.
-
अंकिताने पती विकी जैनसह ‘अनवी की रासलीला’ या होळी पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी तिने सुंदर पेहराव केला होता.
-
अंकिताने पांढऱ्या रंगाचा घेरदार अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर तिने आकर्षक गॉगल घातला होता.
-
यावेळी अंकिताने नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. यासंबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले होते.
-
या पार्टीमध्ये ती पती विकी जैनबरोबर रोमँटिक होताना दिसली. दोघेही यावेळी अतिशय क्यूट दिसत होते.
-
या पार्टीला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. दरम्यान, अंकिताने घातलेल्या कपड्यांवरून तिला ट्रॉलिंगचा सामना करावा लागला.
-
अंकिताने यावेळी दोन ड्रेस घातले होते. सुरुवातीला तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यानंतर तिने पांढऱ्या रंगाचा क्यूट स्कर्ट टॉप घातला होता.
-
होळी खेळताना इतके कपडे बदलतं असं म्हणत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.
-
दरम्यान, नुकतंच अंकिता ‘सावरकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिच्या अभिनयाचे सर्वच कौतुक करत आहेत. (सर्व फोटो : अंकिता लोखंडे)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल