-
१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर सलमान सातत्याने चर्चेत असून यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
-
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सध्या चर्चेत आहे. या अपार्टमेंटमध्ये सलमान खानचे दोन फ्लॅट आहे. ग्राउंड फ्लोअर व पहिल्या मजल्यावर हे दोन्ही फ्लॅट आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहतात. तर, सलमान खान ग्राउंड फ्लोअरवर राहतो. तो वन बीएचकेमध्ये राहतो.
-
गेल्या अनेक वर्षांपासून सलमान आपल्या कुटुंबासह या घरात राहतो. बॉलीवूडचा सुपरस्टार असूनही सलमान या १ बीएचके फ्लॅटमध्ये का राहतो असे विचारण्यात आले असता तो म्हणाला की त्याची आई या घरात राहतो आणि त्याला त्याच्या कुटुंबियांसह राहायचे आहे.
-
गॅलेक्सी अपार्टमेंटशिवाय सलमानकडे आणखी भरपूर घरं आहेत. त्याच्या आणखी अनेक प्रॉपर्टी आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खानकडे अशी आणखी दोन ते तीन घरं आहेत.
-
पनवेलमध्ये सलमान खानचे एक आलिशान फार्महाऊस आहे. सलमान अनेकदा येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतो.
-
कोरोना काळात तो याच फार्महाऊसमध्ये थांबला होता. हे फार्महाऊस १५० एकर जागेत पसरलेले आहे. यामध्ये जिमसहित इतर आणखी सुविधा आहेत. या फार्महाऊसची किंमत अंदाजे ८० कोटी इतकी आहे.
-
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितल्यानुसार सलमानचे दुबईमध्येही एक लग्जरी अपार्टमेंट आहे. त्याचे हे अपार्टमेंट बुर्ज पॅसिफिक टॉवरमध्ये आहे.
-
सलमानने त्याच्या ५१ व्या वाढदिवशी मुंबईच्या गोराई भागामध्ये लग्जरी ५ बीएचके अपार्टमेंट असून यामध्ये मोठे स्विमिंग पूल, जिम, थिएटर, स्वतंत्र बाइक एरिया आहे. या अपार्टमेंटची किंमत अंदाजे १०० कोटी सांगण्यात येत आहे.
-
इतकेच नाही तर सलमान खानकडे स्वतःची प्रायवेट बोट आहे. ही बोट त्याने त्याच्या ५० व्या वाढदिवशी खरेदी केली होती. याची किंमत जवळपास ३ कोटी सांगण्यात येत आहे.
-
सलमान खानच्या एकूण संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास तो २९०० कोटी संपत्तीचा मालक आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि काही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…