-
टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
अविनाश नारकर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत.
-
‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिका लवकरच बंद होणार आहे.
-
या मालिकेत अविनाश नारकर यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
-
‘कन्यादान’ मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
आता लवकरच मालिका बंद होणार असल्याने सेटवर चित्रीकरण पूर्ण झाल्यावर शेवटचा दिवस साजरा करण्यात आला.
-
यावेळी बहुतांश कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री स्मितलने शेअर केलेल्या पोस्टला “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
-
या व्रॅपअप पार्टीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आता ‘कन्यादान’ मालिकेच्या जागी लवकरच ‘आदिशक्ती’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्मितल हळदणकर इन्स्टाग्राम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल