-
दिग्गज फिल्ममेकर करण जोहरने ५ मेला इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत एका टेलिव्हिजन कार्यक्रमाची निंदा केली आहे.
-
करणने त्याच्या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की एका विनोदी कलाकाराने अतिशय अभद्र पद्धतीने त्याची नक्कल केली आहे.
-
करणने या कलाकाराचे आणि कार्यक्रमाचे नाव घेतले नसले तरीही आता स्वतः या कलाकाराने समोर येऊन याबाबत भाष्य केले आहे. या कलाकाराचे नाव केतन सिंह असून तो सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात काम करतो.
-
केतनने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरची माफी मागितली. त्याने म्हटलं की त्याला करणला दुखवायचे नव्हते.
-
तो म्हणाला, “मी करण सरांची माफी मागतो. मी करण जोहर यांचा ‘कॉफी शो’ खूप आवडीने पाहतो. मी त्यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट ५ ते ६ वेळा पाहिला आहे. मी त्याच्या कामाचा आणि त्याच्या शोचा खूप मोठा चाहता आहे.”
-
केतन पुढे म्हणाला, “माझ्या कृतीमुळे ते दुखावले असतील तर मी त्यांची माफी मागू इच्छितो. त्यांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे होते. पण माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्यांची माफी मागतो.”
-
केतन म्हणाला की, “करण जोहर यांनी कदाचित संपूर्ण एपिसोड पाहिला नसून फक्त प्रोमो पाहिला असावा. मला एपिसोड पाहिल्यानंतर लोकांची आणि करण सरांची प्रतिक्रिया बघायला आवडेल. मला सरांचा अपमान करायचा नाही.”
-
“मी काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हे करायचो. ‘मॅडनेस मचायेंगे’वर मी पहिल्यांदाच करण सरांचा अभिनय केला. करण सरांनी मला माफ करावं याव्यतिरिक्त, मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.”, असेही केतन पुढे म्हणाला.
-
याआधी करण जोहरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी माझ्या आईसोबत बसून टीव्ही पाहत होतो… आणि मी एका रिॲलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. यामध्ये एक विनोदी कलाकार माझी नक्कल करत होता. त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली.”
-
“ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत असलेल्या व्यक्तीचा अनादर करते, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप उघड होतात. यामुळे मला या गोष्टीचा राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटलं.”
-
दरम्यान, केतन हा एक अभिनेता, अँकर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. त्याच्या IMBD बायोनुसार, केतन हा एक लेखक देखील आहे. तो काही शो आणि चित्रपटांचा भाग होता.
-
केतनचा जन्म मुंबईत झाला. ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात काम करण्यापूर्वी केतन ‘द कपिल शर्मा शो’मध्येही दिसला होता. यापूर्वी केतन ‘जॉनी जंपर’, ‘पार्टनर्स’, ‘विकी वेलिंगकर’ या चित्रपटांमध्येही दिसला आहे.
-
केतन इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून त्याचे 161K फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा त्याच्या शोमधील कॉमेडी रील आणि व्हिडिओ शेअर करतो.

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या