-
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा पायल कपाडिया दिग्दर्शित आणि लिखित चित्रपट. हा चित्रपट पाम डी’ओर या श्रेणीत प्रदर्शित केला जाणार आहे. या श्रेणीत प्रदर्शित होणार हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
-
या चित्रपटामध्ये दोन मुलींच्या आयुष्यात आलेले मोठे बद्दल दाखवले आहेत. या समस्यांना त्या कश्या उत्तर शोधतात हे पाहण्यासारख आहे.
-
संध्या सुरी दिग्दर्शित ‘संतोष’ हा चित्रपट अन सरटेन रिगार्ड या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा ही एका विधवा महिलेबद्दल आहे जिला तिच्या मृत पतीची पोलीस हवालदार म्हणून नोकरी मिळाली आहे.
-
चिदानंद एस नाईक दिग्दर्शित ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन टू नो…’ हा चित्रपट ला सिनेफ या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे. हा कन्नड चित्रपट लोककथेवर आधारित आहे.
-
श्याम बेनेगल यांनी १९७५ मध्ये प्रदर्शित केलेला ‘मंथन’ चित्रपट पुनर्संचयित आवृत्ती कान्स क्लासिक या विभागाचा एक भाग म्हणून प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड हे मुख्य भूमिकेत आहेत.
-
करण कंधारीने दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘सिस्टर मिडनाईट’ हा कान्स २०२४ मध्ये दिग्दर्शकाच्या फोर्टनाइट सेगमेन्टमध्ये या विभागात प्रदर्शित होणारा हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
-
या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेमुख्य भूमिकेत आहे.
-
‘इन रिट्रीट’चे दिग्दर्शन मैसम अली यांनी केले आहे. हा चित्रपट असोसिएशन फॉर द डिफ्यूजन ऑफ इंडिपेंडंट सिनेमा (एसीआयडी) द्वारे प्रदर्शित केले जाणार आहे.
-
या चित्रपटमध्ये एका ५० वर्षीय माणसाच्या लेहचे प्रवासाबद्दलची कथा आहे.
-
कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘शेमलेस’ हा अन सरटेन रिगार्ड श्रेणीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”