-
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पंचायत-३’ या वेबसिरीजची सर्वत्र चर्चा होत आहे. या मालिकेत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्यासह अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
-
या वेबसिरीजमध्ये जितेंद्र कुमारने ‘सेक्रेटरी जी’ची भूमिका साकारली आहे. चाहत्यांनी जितेंद्रच्या दमदार अभिनयाचे कौतुक केले आहे.
-
जितेंद्र कुमारने ‘पिचर’ आणि ‘कोटा फॅक्टरी’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. यासोबतच जितेंद्रने ‘शुभ मंगल सावधान’, ‘चमन शहर’, ‘जादुगर’ आणि ‘ड्राय डे’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
जाणून घेऊया जितेंद्र कुमारच्या एकूण संपत्तीबद्दल.
-
अभिनेत्याचं मुंबईत घर आहे आणि त्याने आपल्या घरात चित्रपटाची पोस्टर्स आणि अनेक कलाकृती देखील केल्या आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्रच्या कार कलेक्शनच बोलायचं झालं तर ८८.१८ लाखांची मर्सिडीज बेंझ, ८२.१९ लाखांची मर्सिडीज बेंझ ई-क्लास, ४८.४३ लाखांची टोयोटा फॉर्च्युनर आणि ४२ लाखांची मिनी कंट्रीमन कार आहे.
-
जितेंद्र कुमारने ‘पंचायत -३’मधून जवळपास ५.६ लाख रुपये कमावले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला प्रत्येक एपिसोडसाठी ७० हजार रुपये मिळाले आहेत.
-
जितेंद्र कुमार ‘ओसवाल बुक्स’, ‘बिंगो’ आणि ‘इन्शुरन्स देखो’ यांसारख्या अनेक ब्रँड्समधूनही चांगली कमाई करतो. याशिवाय तो आपल्या सोशल मीडिया पोस्टमधूनही कमाई करतो.
-
रिपोर्ट्सनुसार जितेंद्र कुमार सुमारे ७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. (सर्व फोटो : जितेंद्र कुमार/इन्स्टाग्राम)

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य; “विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं, त्यामुळे कुणालाच वाचवणं शक्य झालं नाही”