-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
तसंच सोनाली चालू घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असते. शिवाय ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील देत असते.
-
नुकतंच सोनालीला वजनावरून ट्रोल करण्यात आलं. ज्याला तिनं सडेतोड उत्तर दिलं. पण तिला अचानक वजनावरून का ट्रोल केलं? आणि तिनं नेमकं ट्रोलर्सना काय म्हणाली? जाणून घ्या…
-
सध्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यानं अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर गाणं खूप ट्रेंड होतं आहे. त्यामुळे सोनालीनं देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
-
आकाशी रंगाच्या ड्रेसची लुंगी करून सोनालीनं ‘अंगारों’ गाण्यावर डान्स केला. मूळ गाण्यातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाची हुकस्टेप हुबेहूब अभिनेत्री करताना दिसली.
-
सोनालीच्या याच डान्स व्हिडीओवर तिला वजनावरून ट्रोल करण्यात आलं. “वजन वाढलं आहे. गुड न्यूज आहे का?”, “काय होतीस तू काय झालीस तू”, “किती जाड झालीये आता, तुला कोणता चित्रपट नको?”, “वय झालं शोभत नाही”, “वजन वाढलंय”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या.
-
एका नेटकऱ्याने लिहिलं, “म्हातारं वयात हे बरं नाही वाटतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही किती जाड झालीये आहे. हिचा सगळा लूक गेला. ड्रेसची पण वाट लावली.” अशा सगळ्या नेटकऱ्यांनी ज्यांनी वजनावरून अभिनेत्रीला ट्रोल केलं, त्यांना तिनं चांगलंच उत्तर दिलं.
-
आकाशी रंगाच्या त्याच ड्रेसमधील फोटो शेअर करत सोनालीनं वजनावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तसंच महिलांना देखील एक मोलाचा सल्ला दिला.
-
सोनालीनं लिहिलं, “त्या सर्व महिलांसाठी ज्यांना त्यांच्या शरीर रचनेवरून ट्रोल करण्यात आलं. जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. तुमच्या शरिरावर प्रेम करणं हा तुमचा अधिकार आहे. जे लोक त्यांची मतं तुमच्यावर लादतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या…ट्रोल करनेवाले कभी डरते नही.”
-
सोनाली कुलकर्णीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
-
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं.
-
आता लवकरच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

IND vs PAK Live, Asia Cup 2025 Final: पाकिस्तानची दमदार सुरूवात! भारतीय गोलंदाज विकेट घेण्याच्या प्रयत्नात