-
मंदिरा बेदी हे केवळ टीव्हीच नाही तर चित्रपट आणि क्रीडा विश्वातही प्रसिद्ध नाव आहे. ९० च्या दशकातील टीव्ही शो ‘शांती’ने घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने लाखो मनं जिंकली आहेत.
-
मंदिरा अनेकदा तिच्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत, अभिनेत्री मातृत्वाबद्दल बोलली आहे. मंदिराने सांगितलं की ती तिच्या करिअरबद्दल इतकी गंभीर होती की तिने आई न होण्याचा निर्णय घेतला होता.
-
अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या करिअरबाबत सुरुवातीपासूनच गंभीर आहे. जेव्हा मी आणि राज डेट करत होतो, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं कीं मला आई व्हायचं नाही. कारण प्रेग्नेंसीनंतर लोक तुम्हाला करिअरमध्ये गांभिर्याने घेत नाहीत. “
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्हाला बाळाची घाई नव्हती. पण, काही वर्षांनी आम्ही पाहिलं की आमच्या कुटुंबातील एक जोडपं बाळासाठी धडपडत होतं, हे पाहून माझा विचार बदलला.”
-
मंदिरा पुढे म्हणाली, “ते जोडपं बाळासाठी आयव्हीएफ आणि विविध प्रकारचे उपचार घेत होतं, मग मी विचार केला आणि ठरवलं की मी माझ्यासोबत असं होऊ देणार नाही. मग मी आई न होण्याचा निर्णय बदलला आणि आई होण्याचा निर्णय घेतला.” त्यानंतर तीन महिन्यांनी मी गरोदर राहिले.
-
अभिनेत्री म्हणाली, “लग्नाच्या १२ वर्षांनंतर मी आई झाले. प्रसूतीनंतर माझे वजन ५२ किलोवरून ९० किलोपर्यंत वाढले. हा तो काळ होता जेव्हा मी माझ्या शरीराचा विचार करून रोज रडायचे. त्यावेळी माझ्या पतीने माझी काळजी घेतली. मग मी माझ्या फिटनेसवर काम केले आणि पुन्हा फिट झाले.”
-
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचे लग्न १९९९ मध्ये झाले आणि २०११ मध्ये दोघांनीही आपल्या मुलाचे या जगात स्वागत केले. मग २०२० मध्ये त्यांनी मुलगी तारा हिला दत्तक घेतले.
-
मुलीबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “डेटींगच्या वेळी राज आणि मी ठरवलं होतं की आपण एक मूल दत्तक घेऊ. कोविडच्या काळात, मी राजला सांगितलं की वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मग आम्ही ताराला दत्तक घेतलं.”
-
मंदिरा म्हणाली, “माझा मुलगा त्यावेळी ९ वर्षांचा होता आणि तो म्हणत होता की त्याला बहीण नको आहे. तो रडत होता आणि मीही रडत होते. पण तारा आमच्या घरी आली तेव्हा आमचं जग बदलले. आज वीर व तारा खूप आनंदी आहेत.
(फोटो स्त्रोत: मंदिरा बेदी/फेसबुक)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”