-
मराठीसह बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
-
समीर विद्वांस यांनी जुईली सोनलकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
-
त्यांच्या विवाहसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या जोडप्याच्या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडचा स्टार अभिनेता कार्तिक आर्यनने खास उपस्थिती लावली होती.
-
कार्तिकने दिग्दर्शकाच्या रिसेप्शन पार्टीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
कार्तिकने समीर व जुईली यांच्याबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं.
-
समीर यांच्या रिसेप्शनचे फोटो शेअर करत कार्तिक लिहितो, “एक अशी प्रेमकथा… जी आम्ही सर्वांनी
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या सेटवर आमच्या डोळ्यासमोर बहरताना पाहिली.” -
“समीर व जुईली तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन” अशी पोस्ट कार्तिक आर्यनने या मराठमोळ्या दिग्दर्शकासाठी शेअर केली आहे.
-
याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील बहुतांश सगळेच कलाकार या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. ( फोटो सौजन्य : कार्तिक आर्यन व समीर विद्वांस इन्स्टाग्राम, @shrutisbagwe )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल