-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट नुकतेच लग्न बंधनात अडकले आहे. त्यांच्या लग्नाचे सोहळे चर्चेत असून अनेक बॉलीवूड कलाकारांनी यासाठी हजेरी लावली. लग्नानंतर १३ जुलै रोजी अंबानी कुटुंबाने या जोडप्यासाठी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-विदेशातील सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी सहभागी झाले होते.
-
अनंत-राधिकाच्या या सोहळ्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेही हजेरी लावली. सोहळ्यात अभिनेत्रीने पुष्पा स्टाईलमध्ये ग्रँड एन्ट्री घेतली.
-
या खास सोहळ्यासाठी रश्मिकाने गडद निळ्या रंगाच्या साडीचे परिधान केले होते. अभिनेत्रीने या सुंदर कलामकारी सुशोभित केलेली साडी स्लीव्हलेस ब्लाउजसह निवडला होता.
-
अभिनेत्रीने या साडीसोबत सोनेरी आणि निळ्या रंगाचे स्टोन नेकलेस परिधान केले होते.
-
या लूकला खास बनवत अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गजरा घालून आणि न्यूड मेकअप करून हा लूक पूर्ण केला होता.
-
अभिनेत्रीने या खास लूकचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या या पारंपरिक लूकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
चाहत्यांना रश्मिकाचा हा पारंपरिक लूक पसंतीचा पडला आणि तत्यांनी यासाठी तिचे कौतुक केले.

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य