-
कतरिना कैफचा काल (१६ जुलै) ४१ वाढदिवस साजरा झाला. या खास प्रसंगी कतरिनाचा पती आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
कतरिनाचा वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी विकीने काल त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने कतरिनासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
कतरिना आणि विकीने सोबत घालवलेले सुंदर आणि गोंडस क्षण या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. यासोबतच त्याने कतरिनावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करणारी एक सुंदर कॅप्शन लिहिली आहे, जी त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
-
ही छायाचित्रे शेअर करताना विकीने लिहिले आहे की, “तुझ्यासह जीवन जगताना नवनवीन आठवणी तयार करत जाणे, माझ्या जीवनातील माझे खूप आवडीचे काम आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रेमा.” या कॅप्शनने चाहते खूपच आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले, तशा प्रतिक्रिया ते देत आहेत.
-
विकीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्याच्या आणि कतरिनाच्या नात्यातील अनेक अविस्मरणीय क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.
-
छायाचित्रांमध्ये दोघेही सुट्टीच्या दिवशी मस्ती करताना, एकत्र पूजा करताना, पिझ्झाचा आनंद लुटताना आणि छोटे-छोटे क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
विक्की कौशलने त्याच्या लग्नादरम्यानचा एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी एकमेकांचा हात धरला आहे. दरम्यान, या दोघांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले आहे.
-
बॉलिवूडचे हॉट कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या ३ वर्षांत कतरिना आणि विकी कौशल यांच्यात उत्कृष्ट बाँडिंग पाहायला मिळत आहे.
(Photos Source: @vickykaushal09/instagram)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”