-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे.
-
या मालिकेतील ‘अक्षरा-अधिपती’ (Akshara-Adhipati) हनिमूनसाठी थायलंडला गेले आहेत.
-
प्रेक्षकांना घरबसल्या या मालिकेतून थायलंड (Thailand) पाहायला मिळत आहे.
-
थायलंडमधील आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग व स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना ‘अक्षरा-अधिपती’ दिसत आहेत.
-
‘अक्षरा-अधिपती’च्या हनिमूनचं (Honeymoon) शूटिंग थायलंडमधील क्राबी (Krabi) या ठिकाणी करण्यात आले आहे.
-
क्राबीच्या समुद्रकिनाऱ्यावर बॉलिवूडमधील ‘कहो ना प्यार हैं’ या गाण्याचा प्रोमो शूट करण्यात आला होता.
-
या समुद्रकिनाऱ्यावर ‘अक्षरा-अधिपती’वर एक गाणं चित्रित झाले आहे.
-
या मालिकेच्या शूटसाठी थायलंडमध्ये १५-१६ जणांची टीम गेली होती.
-
या मालिकेतील अधिपती म्हणाला… ‘माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली आहे.’
-
‘नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली…’ असे अधिपती म्हणाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्