-
२५ वर्षांपूर्वी २६ जुलै याच दिवशी भारताच्या उत्तर सीमेवर असलेल्या कारगिलमध्ये युद्ध संपले. या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. ८४ दिवस चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. शौर्य आणि पराक्रमाच्या अनेक कहाण्या या युद्धातून समोर आल्या, ज्या चित्रपट निर्मातेही पडद्यावर आणण्यासाठी आतुर होते. आज कारगिल विजय दिवसानिमित्त आपण कारगिल युद्धावर बनलेल्या चित्रपटांबद्दल माहिती घेणार आहोत.
-
LOC कारगिल
२००३ मध्ये रिलीज झालेला ‘LOC कारगिल’ हा भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ऑपरेशन विजय’वर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, अजय देवगण, सैफ अली खान, संजय कपूर, मनोज बाजपेयी आणि अक्षय खन्ना यांनी भूमिका साकारल्या आहेत. -
धूप
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूप’ या चित्रपटात कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यर यांच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ओम पुरी, यशपाल शर्मा आणि गुल पनाग या अभिनेत्यांनी काम केले आहे. -
लक्ष्य
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्य’ या चित्रपटात करण शेरगिल या सैनिकाची कथा दाखवण्यात आली आहे, जो भारतीय सैन्यात सामील होतो आणि कारगिल युद्धादरम्यान देशासाठी महत्वाची कामगिरी करतो. या चित्रपटात हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. -
टँगो चार्ली
२००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘टँगो चार्ली’ या चित्रपटाचा शेवटचा भाग १९९९ च्या कारगिल युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात बॉबी देओल, अजय देवगण, संजय दत्त, सुनील शेट्टी, नंदना सेन आणि तनिषा देखील दिसले होते. -
मौसम
२०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मौसम’ हा चित्रपट भारतीय वायुसेनेचे लढाऊ पायलट हरिंदर सिंग यांची कथा मांडतो, त्यांना कारगिल युद्धात लढण्यासाठी बोलावण्यात आले होते. या चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहेत. -
गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल
२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात भारतीय वायुसेनेच्या पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे, त्या युद्ध लढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वायुसेना पायलट बनल्या आणि भारताला विजय मिळवून देण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. या चित्रपटात जान्हवी कपूर, अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. -
शेरशाह
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांची कथा दाखवण्यात आली आहे. कारगिल युद्धादरम्यान त्यांना शेरशाह हे सांकेतिक नाव देण्यात आले होते,त्यावरूनच चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. (Stills From Film)
(हे देखील वाचा: या देशांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण जिंकले, भारत पहिल्या 10 च्या जवळपासही नाही )

राज्यात २४ ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; ‘या’ भागात पडणार सर्वाधिक पाऊस