-    ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं घर कसं असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. अखेर या घराची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. 
-    ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्रीलाच भव्य प्रवेशद्वार आहे. 
-    प्रशस्त अशा हॉलमध्ये स्पर्धकांसाठी आरामदायी अशा आधुनिक फर्निचरची निर्मिती करण्यात आली आहे. 
-    यंदा कॅप्टन रुम अन् बेडरुमला निळ्या व जांभळ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आलं आहे. 
-    कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे. 
-    यंदा घरातील किचन मॉर्डन सुख-सुविधांनी सुसज्ज असं आहे. 
-    स्पर्धकांना वेळ घालवण्यासाठी व टास्क खेळण्यासाठी प्रशस्त असं गार्डन देण्यात आलं आहे. 
-    गार्डन परिसरात स्विमिंग पूल सुद्धा आहे. तसेच ‘बिग बॉस’मध्ये यावर्षी पहिल्यांदाच बाल्कनी असणार आहे. संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे. 
-    ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाचं हे घर सध्या सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : बिग बॉस मराठी व कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम ) 
 
  GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  