-
एका अभिनेत्रीला तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळाली की सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा असायची.
-
१९ व्या वर्षी तिला एका गाण्याने देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली.
-
या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं, तिला एक सिनेमा मिळाला ज्यात तिने अक्षय कुमार, सलमान खानबरोबर कामही केलं. पण नंतर मात्र तिचं करिअर फारसं चमकलं नाही.
-
या अभिनेत्रीचे नाव शेफाली जरीवाला. २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती खूप लोकप्रिय झाली.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीने पापाराझी अभिनेत्रींचे पाठमोरे फोटो काढतात, त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
-
सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही वेळा अभिनेत्रींचे पाठमोरे व्हिडीओ असतात जे विचित्र पद्धतीने शूट केलेले असतात.
-
याआधी जान्हवी कपूरसह अनेक अभिनेत्रींनी यावर प्रतिक्रिया देत याला चुकीचं म्हटलं होतं. पण ‘कांटा लगा गर्ल’ म्हणजेच शेफाली जरीवालाला मात्र ते चुकीचं वाटत नाही.
-
खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे अशा व्हिडीओवर आक्षेप नसल्याचं तिने म्हटलंय.
-
शेफाली नुकतीच पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये आली होती, तिथे तिने याबद्दल तिचं मत मांडलं.
-
पॉडकास्टमध्ये पारस म्हणाला, “मी तुमची एकही रील पाहिली, ज्यात तू व पराग (शेफालीचा पती) दोघेही होतात. त्यावेळी तुझं कानातलं खाली पडलं, तू ते उचलण्यासाठी वाकणार तेवढ्यात तुझ्याकडे कॅमेरा वळला. परागने ते पाहिल्यावर तुला कानातलं उचलण्यापासून थांबवलं आणि स्वतः कानातलं उचलून तुला दिलं. तर जे पापाराझी पाठीवर किंवा नितंबांवर फोकस करून व्हिडीओ काढतात, त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे?”
-
यावर शेफाली म्हणाली, “माझा त्यावर अजिबात आक्षेप नाही कारण मी माझे नितंब चांगले दिसावे, यासाठी खूप मेहनत घेते.”
-
असं म्हटल्यानंतर शेफाली व पराग हसू लागले.
-
यावेळी शेफालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं.
-
शेफाली जरीवालाने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं, पण या जोडप्याला अद्याप बाळ नाही.
-
बाळाच्या नियोजनाबाबत शेफाली म्हणाली, “माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत.”
-
बाळ दत्तक घ्यायचा विचार केला, पण ती प्रक्रिया खूप मोठी असल्याने निर्णय बदलला असंही शेफालीने सांगितलं.
-
(सर्व फोटो – शेफाली जरीवाला इन्स्टाग्राम)

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…