-
प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी यांच्या घर लवकरच एक नवीन पाहुण्याचे स्वागत होणार आहे. युविका चौधरी आई होणार असून काही वेळापूर्वी या जोडप्याने सोशल मीडियावर खूप सुंदर पद्धतीने चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली होती.
-
यानंतर अलीकडेच युविकाने आपला बेबी शॉवर साजरा केला, या समारंभात ती खूपच सुंदर दिसत होती.
-
चाहत्यांनी या जोडप्याला अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.
-
युविकाने आपल्या सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.
-
इंस्टाग्रामवर एका व्हिडिओमध्ये युविका म्हणाली, “मला स्वतःला ओळखताही येत नाही. काही वेळानंतर हे काही नसेल”.
-
व्हिडिओमध्ये ती पुढे म्हणाली, “मुद्द्याचं बोलायचं तर मी आई कशी होणार हे तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचे होतं, मी आयव्हीएफच्या मदतीने गर्भधारणा केली आहे. मी आयव्हीएफ का निवडले, हे देखील मी तुम्हा सर्वांना सांगेन. मला तुम्हा सर्वांना सर्व गोष्टी सांगायच्या आहेत, जेणेकरुन मला ज्या गोष्टींचा सामना करावा लागला त्याचा इतर महिलांना त्रास नाही होणार.
-
युविकाने नैसर्गिक गर्भधारणेऐवजी आयव्हीएफ का निवडले हे तिने अद्याप सांगितलेले नाही आहे.
-
युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांची भेट पहिल्यांदा ‘बिग बॉस-९’ मध्ये झाली आणि यानंतर २०१८ मध्ये ते लग्नाबंधनात अडकले.
-
(सर्व फोटो: युविका चौधरी/इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”