-
बॉलिवूडमध्ये अशा अनेक गोष्टी घडतात ज्या ऐकून सर्वसामान्य लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक गोष्ट म्हणजे एखाद्या कलाकाराला चित्रपटातून काढून टाकणे आणि त्याच्या जागी नवा कलाकार घेणे. अनेक मोठे अभिनेते आणि अभिनेत्रींसोबतही असे घडले आहे.
-
बरेचदा निर्माते चित्रपटांमध्ये वेगळे कलाकार कास्ट करतात, परंतु नंतर काही कारणास्तव त्यांना दुसऱ्या स्टारला कास्ट करावे लागते. या यादीमध्ये करीना कपूर ते श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
-
डीएनएनुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूरला सायना नेहवालच्या बापोयिकमधून काढून टाकण्यात आले. तिच्या जागी परिणीती चोप्राने ही भूमिका बजावली.
-
डीएनएनुसार, अभिनेता सोनू सूदने कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट साइन केला होता. पण काही मतभेदांमुळे सोनूच्या जागी मोहम्मद झीशान अय्युबने या चित्रपटात काम केले.
-
डीएनएनुसार, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्याने हा चित्रपटही साइन केला होता पण नंतर त्याची जागा अर्जुन कपूरने घेतली.
-
डीएनएनुसार, तारा शर्माने ‘साया’ चित्रपटात कतरिना कैफची जागा घेतली होती. कतरिनाला त्या चित्रपटात साइन करण्यात आले होते पण काही मतभेदांमुळे कतरिनाने चित्रपट सोडला.
-
डीएनएनुसार, सलमान खानमुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायला निर्माता शाहरुख खानने ‘चलते चलते’ चित्रपटातून काढून टाकले होते. वीर-जारा या चित्रपटातही प्रितीने ऐश्वर्याची जागा घेतली.
-
डीएनएनुसार, अभिनेत्री करीना कपूर हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण तसं झालं नाही, करिनाच्या जागी अमिषा पटेलला स्थान देण्यात आलं.
-
डीएनएनुसार, करीना कपूर आणि ईशा देओल यांनीही अनेक चित्रपटांमध्ये अमिषा पटेलची जागा घेतली आहे. असे सांगण्यात येते की अमिषाच्या हातून अनेक मोठे चित्रपट निसटले. (All Photos: IMDb)

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…