-
सध्या जुने लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत,तसेच त्यांना प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देत आहेत. चला जाणून घेऊ अशाच काही चित्रपटांबद्दल.
तुम बिन: प्रियांशु चॅटर्जी, संदली सिन्हा, हिमांशू मलिक आणि राकेश बापट स्टारर रूम बिन हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी पुन्हा रिलीज होत आहे. -
ताल: अनिल कपूरचा लोकप्रिय चित्रपट ताल 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाला 27 सप्टेंबर रोजी 25 वर्षे देखील पूर्ण होणार आहेत.
-
तुंबाड : समीक्षकांनी नावाजलेला तुंबाड हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. सोहम शाह स्टारर या सिनेमाने पुन्हा रिलीज झाल्यापासून अवघ्या सात दिवसांत 13.44 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
-
रेहना है तेरे दिल में: सैफ अली खान, दिया मिर्झा आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 30 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम मेनन यांनी केले आहे.
-
गँग्स ऑफ वासेपूर: अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर (2012) चे दोन्ही भाग 30 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित करण्यात आले.
-
शोले: आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय मोठा चित्रपट शोले आहे. या चित्रपटाचे 31 ऑगस्ट रोजी मुंबईतील रीगल सिनेमात स्क्रिनिंग केले होते.
-
लैला मजनू: तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी स्टारर या चित्रपटाला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले.
-
रॉकस्टार: इम्तियाज अलीचा 2011 म्युझिकल ड्रामा रॉकस्टार, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी मुख्य भुमिकेत होते, हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला होता.
-
वीर-झारा: शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी, मनोज बाजपेयी, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, बोमन इराणी, किरण खेर, दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 13 सप्टेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित झाला.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल