-
अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवूडमधील बड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
आलिया आता आईही झाली आहे.
-
आई झाल्यानंतर ती पुन्हा चित्रपट करिअरकडे लक्ष देत आहे.
-
तिचा नवा सिनेमा आता प्रदर्शनच्या वाटेवर आहे.
-
या सिनेमाचं नाव आहे ‘जिगरा’.
-
आलियाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
दरम्यान, आलिया सोमवारी (२३ ऑगस्ट) झालेल्या पॅरिस फॅशन वीक (Paris Fashion Week) मध्ये सहभागी झाली होती.
-
तेथील फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री आलिया भट्टचे हे नवे फोटो व्हायरल झाले असून, ती या फोटोंमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.
-
दरम्यान या कार्यक्रमात आलियाने एका नामांकित ब्युटी ब्रँडसाठी खास अंदाजात रॅम्प वॉक केला.
-
यावेळी आलिया भट्टने मेटॅलिक सिल्व्हर बस्टीअर परिधान केले होते, याबरोबर तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंपसूटसह पेअर केले होते.
-
या लूकसाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला होता. यावेळी तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक, गुलाबी रंगाची आयशॅडोही लावली होती. तर कानामध्ये चांदीचे इअरिंगस घातले होते. यावेळी तिने तिचे केस मोकळे ठेवले होते.
(सर्व फोटो साभार- आलिया भट्ट इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos: ‘समिंद्री’ सई ताम्हणकर! अभिनेत्रीचा रंगीबेरंगी हटके ड्रेसमधील खास लूक…

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”