-
प्रसिद्ध टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी परतला आहे.
-
६ ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या १८ व्या सीझनची सुरुवात झाली.
-
यंदाही बिग बॉसचा सीझन खुद्द बॉलीवूड स्टार सलमान खान होस्ट करणार आहे.
-
या १८ व्या सीझनसाठी शोमध्ये अनेक टीव्ही कलाकार स्पर्धक म्हणून आले आहेत.
-
यादरम्यान अभिनेत्री ॲलिस कौशिक या सीझनची १८ वी स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये दिसणार आहे आणि सध्या अभिनेत्री चर्चेत आहे.
-
ॲलिसबद्दल बोलायचे झाले, तर ॲलिस ही मुळची दिल्लीची आहे. तिने तिचे संपूर्ण शिक्षण हे दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे.
-
पुढे अभिनयातील आवडीसाठी ती मुंबईत आली. ॲलिसने अनेक हिंदी मालिकेंमध्ये काम केलं आहे.
-
सोनी टीव्हीवरील ‘सूर्य पुत्र कर्ण’ या मालिकेतून तिने हिंदी मनोरंजनसृष्टीत प्रवेश केला.
-
यानंतर ॲलिसने ‘कहाँ हम कहाँ तुम’ आणि ‘काटेलाल अँड सन्स’ या मालिकेंमध्येही काम केलं.
-
स्टार प्लस वाहिनीवरील ‘पंड्या स्टोर’ या मालिकेमध्ये ‘रावी’ या भूमिकेमुळे ॲलिसला एक वेगळी ओळख मिळाली.
-
मालिकेमधील तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
‘पंड्या स्टोर’मध्ये ‘शिवा’ची भूमिका साकारणारा अभिनेता कंवर ढिल्लन आणि ॲलिसच्या जोडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगायच्या; काही वेळानंतर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.
-
कंवरने सोशल मीडियावर ॲलिसला बिग बॉसच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
-
ॲलिसच्या वैयक्तिक जीवनात झालेल्या गोष्टींना मागे टाकून तिने आपल्या आयुष्यात प्रगती केली, याबद्दल सलमान खाननेदेखील तिचे कौतुक केले.(फोटो: ॲलिस कौशिक/इन्स्टाग्रामवर)

Today’s Horoscope: आश्लेषा नक्षत्रात ‘या’ राशींना मिळणार धनलाभासह जोडीदाराची साथ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार? वाचा सोमवारचे राशिभविष्य