-
टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा हा बिग बॉसचा १८ वा सीझन आहे.
-
दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार बिग बॉसच्या घराचा सेट तयार केला जातो.
-
यावेळी बिग बॉस १८ साठी ‘समय का तांडव’ ही थीम निवडण्यात आली आहे.
-
बिग बॉसच्या १८ व्या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकार स्पर्धक म्हणून बघायला मिळत आहेत.
-
यंदा बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरदेखील शोमध्ये सहभागी झाली आहे.
-
बॉलीवूड स्टार सलमान खानने बिग बॉसचे अनेक सीझन होस्ट केले आहेत. प्रेक्षक दरवर्षी सलमान खानला होस्ट म्हणून बघण्यासाठी आतुर असतात.
-
शो होस्ट करण्यासाठी सलमान खान निर्मात्यांसोबत कोट्यावधी रुपयांचा करार करतो.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सलमान खानला बिग बॉस १८ साठी २५० कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे.
-
या रकमेसह सलमान खान सर्वाधिक मानधन घेणारा होस्टदेखील बनला आहे.(सर्व फोटो : सलमान खान/इन्स्टाग्राम)

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक