-
आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी एकत्र संपूर्ण कुटुंबीयांबरोबर यंदाची दिवाळी साजरी केली.
-
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलियाने लेक राहाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
याशिवाय आलिया, राहा आणि रणबीर यांनी एकत्र पापाराझींसमोर येऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
-
आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहाचा गोड अंदाज पाहायला मिळत आहे.
-
चिमुकल्या राहाने दिवाळीनिमित्त आपल्या आई-बाबांच्या कपड्यांना मॅचिंग होईल असा ड्रेस घातला होता.
-
आई-बाबांबरोबर पूजा करताना राहाच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव सर्वांसाठीच लक्षवेधी ठरला.
-
एका फोटोत नीत कपूर पूजा करताना राहा रणबीरच्या मांडीवर बसून चेहऱ्यावर खोडकर एक्स्प्रेशन्स देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
पारंपरिक लूकमध्ये भट व कपूर कुटुंबीय अतिशय सुंदर दिसत आहेत.
-
राहाच्या गोड अंदाजाची नेहमीप्रमाणे सर्व नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोंवर सर्वांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट इन्स्टाग्राम व अभिनेत्रीचे फॅन पेजेस )

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक