-
UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे आणि IPS अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. मात्र मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सिमला प्रसाद यांनी हे आव्हान पेललेच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
आयपीएस अधिकाऱ्यासाठी चित्रपटांमध्ये काम करणे जितके अनोखे असते तितकेच आव्हानात्मक असते. सिमला प्रसाद यांच्या आयुष्यातील या रंजक प्रवासाबद्दल जाणून घेऊया. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
८ ऑक्टोबर १९८० रोजी भोपाळमध्ये जन्मलेल्या सिमला प्रसाद यांचा सुरुवातीपासूनच कला आणि साहित्याकडे कल होता. त्यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद हे १९७५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि खासदार आहेत, तर त्यांची आई मेहरुन्निसा परवेझ प्रसिद्ध लेखिका आहेत. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
अशा प्रतिष्ठित कुटुंबात जन्मल्यामुळे सिमला यांना शिक्षण आणि कला या दोन्हींचा समतोल साधण्याची प्रेरणा मिळाली. सेंट जोसेफ कोएड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
यानंतर त्यांनी स्टुडंट्स फॉर एक्सलन्स (IEHE) मधून B.Com आणि बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ येथून समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या परीक्षेत त्यांनी अव्वल राहून सुवर्णपदकही पटकावले. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सिमला यांनी मध्य प्रदेश लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस उपअधीक्षक म्हणजेच डीएसपी पद मिळवले. डीएसपी म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू केली. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय, स्वयं-अभ्यासाद्वारे, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०१० च्या बॅचमधील पहिल्या IPS अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांनी देशात ५१ वा रँक मिळवला. ((Photo Source: @simalaprasad/instagram)
-
त्यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर, आयपीएस अधिकारी झाल्यानंतर सिमला चित्रपट दिग्दर्शक जयघम इमाम यांना भेटल्या, त्यांनी त्यांचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून त्यांना ‘अलिफ’ या चित्रपटात भूमिका ऑफर केली. (Photo Source: @simalaprasad/instagram)
-
सिमला यांनीही ती संधी स्वीकारली आणि त्यांचा पहिला चित्रपट ‘अलिफ’ २०१७ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये ‘नक्कश’ चित्रपटातही काम केले. (Photo Source: @simalaprasad/instagram)
हेही वाचा – Photos : ४४ वर्षीय ‘बेबो’चा हॉट अवतार; पती सैफ अली खानबरोबरचे सुट्टीमधील फोटो व्हायरल, नो मेकअप लूकचे चाहत्यांकडून कौतुक

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL