-
डिस्पॅच (२०२४)
मनोज बाजपेयी, शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल अभिनीत ‘डिस्पॅच’ ही जॉय या क्राईम रिपोर्टरची कथा आहे जो प्रिंट पत्रकारिता वाचवण्यासाठी लढतो. हा चित्रपट १३ डिसेंबरला Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो स्रोत: Zee5) -
बर्लिन (२०२३)
1993 मध्ये नवी दिल्ली येथे सेट झालेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटात अपारशक्ती खुराना, इश्वाक सिंग आणि राहुल बोस मुख्य भूमिकेत होते. ही कथा अशोक सिंग या मूकबधिर तरुणाची आहे, ज्यावर परदेशी गुप्तहेर असल्याचा आरोप असतो. (फोटो स्रोत: Zee5) -
हाऊस ऑफ लाईज (२०२४)
संजय कपूर आणि हितेन पँटल स्टारर हा चित्रपट एका गूढ मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो. (फोटो स्रोत: Zee5) -
रुद्रांगी (२०२३)
तेलुगू भाषेत बनलेला, हा चित्रपट भीमराव देशमुख या शक्तिशाली आणि क्रूर माणसाची कथा आहे, जो आपल्या भागातील लोकांना दबावाखाली ठेवतो. (फोटो स्रोत: Zee5) -
रांगी (२०२२)
त्रिशा अभिनीत तमिळ चित्रपट एका ऑनलाइन रिपोर्टरची कथा सांगतो. (फोटो स्रोत: Zee5) -
चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट (२०२२)
दुल्कर सलमान, सनी देओल आणि श्रेया धन्वंतरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका सिरीयल किलरची कथा आहे. (फोटो स्रोत: Zee5) -
सिया (२०२२)
सिया ही एका छोट्या शहरातील मुलीची कथा आहे, जी न्यायासाठी संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवते. हा चित्रपट प्रेक्षकांना अन्यायाची सत्यता आणि धाडसाची जाणीव करून देतो. (फोटो स्रोत: Zee5) -
कुरुथी अट्टम (२०२२)
कुरुथी अट्टम या तामिळ चित्रपटात सरकारी रुग्णालयात काम करणारा तरुण आणि गुन्हेगाराचा मुलगा यांच्यातील मैत्री दाखवण्यात आली आहे. गुन्हेगाराच्या मुलाचा खून होतो तेव्हा हा मित्र त्याचा बदला घेण्यासाठी जातो. (फोटो स्रोत: Zee5) -
स्नेक आयलंड: पायथन (२०२२)
या चित्रपटात, एका जादुई झाडाचा शोध घेत असताना, लोकांना एका गूढ जंगलात एका धोकादायक अजगराचा सामना करावा लागतो. (फोटो स्रोत: Zee5)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL