-
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर तिच्या पारंपरिक लूकचे फोटो शेअर केले आहेत.
-
माधुरी दीक्षित तिच्या एव्हरग्रीन सौंदर्य आणि नृत्य अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत.
-
सध्या बॉक्स ऑफिसवर दणाणून बाजी मारत असलेल्या भूल भुलैया ३ या हिंदी चित्रपटात माधुरीने काम केले आहे.
-
या लूकसाठी माधुरीने काळ्या रंगाचा डिझायनर शरारा परिधान केला आहे.
-
शराऱ्यावर असलेल्या सुरेख अशा एम्ब्रॉयडरीमुळे माधुरीच्या या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
सोशल मीडियावर पोस्ट करीत माधुरीने ‘Koi lafzo ke liye baitha raha, kisi ne aakhein padh li’ अशी कॅप्शन टाकली आहे.
-
हातातील बांगड्या आणि मोठ्या कानातल्यांमुळे माधुरीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
-
शराऱ्यावर परिधान केलेल्या ओढणीमुळे माधुरीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
या फोटोमध्ये माधुरीने ओढणी दोन्ही हातात घेऊन पोज दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम )