-
राशी खन्ना आणि विक्रांत मेसी यांचा साबरमती रिपोर्ट चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.
-
विक्रांत मॅसीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. गुजरातमधील गोध्रा घटनेची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला रिलीज झाल्यापासूनच लोकांकडून प्रेम मिळत आहे.
-
दरम्यान त्यामुळे आता संसदेच्या बालयोगी सभागृहात चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण टीमसोबत चित्रपट पाहिला आणि सर्वांची भेट घेतली.
-
यावेळचे फोटो आता अभिनेत्री राशी खन्नाने शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आदी अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
-
राशीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
-
पंतप्रधान मोदी यावेळी नेहमीच्या लूकमध्ये दिसले. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.
-
“Such an eventful evening! To think that our humble little film, born from passion and poured with heart, has reached the esteemed eyes of our Prime Minister. It’s a surreal feeling indeed.
To see our work resonate with someone who inspires millions is truly humbling. It’s a testament to the power of cinema, the power of storytelling, and the power of dreams.
So Grateful.” असं कॅप्शन राशीने या फोटोंना दिलं आहे. -
(सर्व फोटो साभार- राशी खन्ना/इन्स्टाग्राम)
हेही पाहा- देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री! भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड, भाषणात म्हणाले…

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल