-
बॉलीवूड उत्तम चित्रपटांसाठी ओळखले जात असेल तरी, असे अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये देखील बनवले गेले ज्यांचा समावेश ऑल टाइम फ्लॉप चित्रपटांमध्ये आहे. आपण IMDb रेटिंगनुसार आदळलेल्या अशा 10 चित्रपटांची यादी जाणून घेऊयात.
-
देशद्रोही
कमाल राशिद खान (KRK), ग्रेसी सिंग आणि हर्षिता भट्ट यांचा 2008 मध्ये रिलीज झालेला ‘देशद्रोही’ चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग फक्त 1.2 आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. -
हिम्मतवाला
अजय देवगण 2013 मध्ये हिम्मतवालामध्ये दिसला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 1.8 आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. -
हमशकल्स
2014 मध्ये रिलीज झालेल्या हमशकल्सचे IMDb रेटिंग 1.7 आहे. या चित्रपटात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल. -
जानी दुष्मन: एक अनोखी कथा
2002 च्या जानी दुश्मन चित्रपटाचे IMDb रेटिंग 2.7 आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार कोहली यांनी केले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. -
कर्ज
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्ज’ चित्रपटाचे IMDb रेटिंग 2.3 आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. -
तीस मार खान
अक्षय कुमारचा 2010 मधील तीस मार खान या चित्रपटाला 2.8 चे IMDb रेटिंग आहे. या चित्रपटात कतरिना कैफही दिसली होती. हा चित्रपट तुम्ही YouTube वर पाहू शकता. -
आपका सुरुर
2007 मधील आपका सुरुर या चित्रपटाचे IMDb रेटिंग 2.4 आहे. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे. -
राम गोपाल वर्मा यांचा आग
2007 च्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित आग या चित्रपटाचे IMDb रेटिंग 1.4 आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले होते. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. -
द्रोण
2008 मध्ये आलेल्या द्रोण चित्रपटाचे IMDb रेटिंग 2 आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. -
लव्ह स्टोरी 2050
2008 मध्ये रिलीज झालेल्या प्रियंका चोप्राचा चित्रपट लव्ह स्टोरी 2050 ला IMDb रेटिंग 2.6 आहे. हा चित्रपट हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”