-
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटात गश्मीरबरोबर मृण्मयी देशपांडे आणि सुरभी भोसले पाहायला मिळणार आहेत.
-
७ जानेवारीला गश्मीरचा ‘एक राधा एक मीरा’ नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
-
‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटाचं सध्या गश्मीर प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकताच गश्मीरने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलशी संवाद साधला. यावेळी गश्मीरने त्याच्या टोपण नावाचा आणि दहावीत मिळालेल्या टक्क्यांचा खुलासा केला.
-
गश्मीरला सर्वजण ‘दादा’ या टोपण नावाने हाक मारतात.
-
टोपण नावाविषयी सांगताना गश्मीर म्हणाला की, मला घरात सगळे ‘दादा’ या टोपण नावाने हाक मारतात. मला आदर, सन्मानाने कोणी ‘दादा’ म्हणत नाही. माझ्या आजोबांना पण ‘दादा’ म्हणायचे. तेच त्यांचं टोपण नाव होतं. जे मला घरी पडलं.
-
गश्मीर लहानपणी अभ्यासात खूप हुशार होता.
-
अभिनेत्याला दहावीत ८६ टक्के मिळाले होते. त्यानंतर त्याने कॉमर्समधून शिक्षण घेतलं.
-
सर्व फोटो सौजन्य – गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”