-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिचा गुलकंद या चित्रपटाचं प्रमोशन करते आहे.
-
त्यासाठी तिने विविध लूक करत फोटोशूटही केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने प्लेन काळ्या रंगाची साडी नेसली आहे तर त्यावर पांढऱ्या व काळ्या रंगाचे डिझायनर ब्लाऊज पेअर केले आहे.
-
हा एक नवा लूकही सईने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
यामध्ये तिने पांंढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली आहे.
-
तर काळ्या रंगाचा प्लेन ब्लाऊज तिने घातला आहे. तसेच काळ्या रंगाची रिबीन केसांना लावत तिने या लूकला रेट्रो टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
याशिवाय तिच्या हातात आकर्षक पर्सही दिसते आहे.
-
तर या आणखी एका लूकमध्ये काळ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसत सईने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
दरम्यान सईचा गुलकंद हा मराठी चित्रपट आज १ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात सई, समीर चौघुले, प्रसाद ओक आणि इतर अनेक कलाकार पाहायला मिळतील. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘या’ भाजीचा ज्यूस प्या