-
Met Gala च्या रेड कार्पेटवर यंदा ईशा अंबानीच्या जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
अनामिका खन्नाने ईशासाठी हा खास ड्रेस डिझाइन केला आहे. स्टायलिश आऊटफिटमध्ये ईशाने यंदाच्या ‘Met Gala’ च्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं.
-
ईशाचे ‘मेट गाला’ सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
सुंदर असं भरतकाम केलेला पांढऱ्या रंगाचा कॉर्सेट कोट आणि काळ्या रंगाची टेलर ट्राउझर या लूकमध्ये ईशा प्रचंड स्टायलिश दिसत होती.
-
ईशाने या ड्रेसवर सुंदर अशी ज्वेलरी घातली होती. यात तिच्या गळ्यातील नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
ईशाने गळ्यात घातलेल्या नेकलेसची किंमत तब्बल ८३९ कोटी एवढी आहे.
-
ईशा म्हणते, “मी माझ्या आईचा ( नीता अंबानी ) नेकलेस आज घातला आहे. याशिवाय हातातील या अंगठ्या आणि कमरेभोवती लटकवलेला चाव्यांचा गुच्छ देखील माझ्या आईचा आहे.”
-
ईशाचा हा ड्रेस डिझाईन करण्यासाठी तब्बल २० हजार तासांहून अधिक वेळ लागला आहे.
-
स्टारलिश लूक करून ईशाने केसांची वेणी घालून एकदम देसी हेअरस्टाइल केली होती. तसेच रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना तिने कमीत कमी मेकअप केल्याचं पाहायला मिळालं. सध्या सर्वत्र ईशाच्या लूकचं कौतुक करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : Ambani Family/Insta )

“त्या सीनचे शूटिंग करताना…”, ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”